
0000-00-00
नाडी दोष असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते. घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात. यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये.
हिंदू परंपरांमध्ये विवाहापूर्वी मुला मुलींची पत्रिका जुळविण्याची प्रथा आहे. पत्रिका मिलनावरून कळते की वधू-वरांचे वैवाहिक जीवन कसे असेल? यातून नाडी दोष, भकूट दोष, गण, मैत्री स्वभाव इ. पत्रिका पाहतांना नाडी किंवा भकूट दोष आढळल्यास विवाहानंतर समस्या निर्माण होतात.
यामध्ये नाडी दोष असल्यास लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. ज्योतिषांच्या मते नाडी दोष असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते. घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात. यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये.
असे असूनही, जर वधू-वरांना एकमेकांशी लग्न करायचे असेल तर ते ज्योतिषी सल्ला घेऊन लग्न करू शकतात. तर चला नाडी दोषाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
नाडी दोष म्हणजे काय ? Nadi Dosh
ज्योतिषांच्या मते वधू आणि वर दोघांची नाड एकच असेल तर हा दोष लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार नाडीचे अनुक्रमे आदि नाडी, मध्य नाडी, अंत्य नाडी असे तीन प्रकार आहेत.
नाडी दोष प्रभाव :- Nadi Dosh
जर वधू आणि वर दोघांची नाडी समान असेल तर उपाय अनिवार्य आहे. जर वधू आणि वर यांनी उपाय न करता लग्न केले तर मुलीला म्हणजेच वधूला गर्भधारणेत समस्या येऊ शकतात. त्याच वेळी असामान्य मूल देखील जन्माला येऊ शकते.
नाडीत बिघाड झाला की अचानक त्रास होत राहतो. त्याच वेळी वधू आणि वर यांच्यातील संबंध अत्यंत कटू राहतात. या परिस्थितीत नातं तोडण्याची देखील शक्यता उद्भवते.
मध्य नाडी दोष असल्यास वधू-वरांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
नाडी दोष दूर करण्यासाठी काय करावे ? :-
नाडी दोष दूर करण्यासाठी वधू आणि वर दोघांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यासोबतच नाडी दोष रोखणे अनिवार्य आहे. याशिवाय नाडी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी गाय, सोन्याचे धान्य, अन्न, वस्त्र यांचे दान करावे. Nadi Dosh
अनेक ज्योतिषी नाडी दोष दूर करण्यासाठी वजनाच्या समान अन्न दान करण्याची शिफारस करतात.
दोष असलेल्या स्त्रिया आणि पुरुषांनाही शास्त्रात भगवान विष्णूच्या मूर्तीशी विवाह करण्याचे सांगितले आहे. या उपासना पद्धतीमुळे दोषाचा प्रभाव कमी करता येतो. विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर हे करणे योग्य ठरेल.
सोन्याचे दान केल्याने नाडीचे दोषही दूर होतात. अन्नदान केल्याने नाडी दोषांचा प्रभावही कमी होतो. सोन्याने बनवलेल्या नागाच्या आकाराचे दान केल्यानेही या दोषाचा प्रभाव कमी होतो. Nadi Dosh
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा :- नेमका काय असतो नाडी दोष
विवाह विषय नाडी दोष विचार :- Nadi Dosh
आपल्या लग्नाच्या आधी आपल्या जोडीदाराबरोबर किती गुण जुळतात हे पाहण्यासाठी पत्रिका मिलन साठी पाहिले जाते त्यातलाच हा प्रकार नाडी दोष ह्याला अष्टकूट मधील ८ गुणांचा पेपर असे म्हणतात.
वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट, नाडी ह्या अष्टकुटात नाडी हा विषय येथे मांडण्याचा प्रयत्न करतो जो ह्यात फार महत्वाचा पार्ट आहे. ह्याचे कारण आपण पाहिले असेल कि इथे नाडी ला ८ गुण दिले आहेत. सर्वात जास्त गुणांचा चा पेपर म्हणजे नाडी.
१) वर्ण ला १ गुण - Nadi Dosh
2) वश्य ला २ गुण - Nadi Dosh
३) तारा ला ३ गुण- Nadi Dosh
४) योनी ला ४ गुण - Nadi Dosh
५) ग्रह मैत्री ला ५ गुण - Nadi Dosh
६) गण ला ६ गुण - Nadi Dosh
७) भकूट ला ७ गुण- Nadi Dosh
८) नाडी ला ८ गुण - Nadi Dosh
एकूण ३६ गुण
नाडी ह्या विषयाला सर्वात जास्त गुण असल्यामुळे इथे हा विषय आधी मांडतो.
नाडी प्रकारात ३ नाड्या — आद्य – मध्य – अंत्य
१) आदी अथवा आद्य :-
ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली आद्य नाडी असेल. अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, जेष्ठा, मूळ, शततारका, पूर्वा भाद्रपदा. ह्या नाडीला पिंगला नाडी सुद्धा म्हणतात.
ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक वात प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर ब्रह्मा चे शाशन असते.
2) आदी अथवा आद्य :-
ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली आद्य नाडी असेल. अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, हस्त, जेष्ठा, मूळ, शततारका, पूर्वा भाद्रपदा. ह्या नाडीला पिंगला नाडी सुद्धा म्हणतात.
ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक वात प्रवृत्ती चे मानले जातात. ह्या नाडीवर ब्रह्मा चे शाशन असते.Nadi Dosh
३) अंत्य :-
ह्यात जर आपला जन्म खालील नक्षत्रांवर झाला असेल तर आपली अंत्य नाडी असेल. कृतिका, रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाति, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण आणि रेवती. ह्या नाडीवर जन्म घेतलेले जातक कफ प्रवृत्ती चे मानले जातात.
ह्या नाडीवर शिवाचे शाशन असते.
आयुर्वेद विचार :-
आजही आपण आयुर्वेदाचार्याकडे गेलो, तर ते आधी आपली नाडी तपासतात. म्हणजे मनगटावर बोट ठेवून ठोक्यांवरुन ते आपली नाडी बघतात. त्यावरुन ते आपण पित्त, वात किंवा कफ या तीन पैकी कुठल्या प्रवृत्ती आहोत हे ओळखतात.
हीच नाडी आपल्या पत्रिकेत दाखवलेली असते.Nadi Dosh
ज्योतिषशास्त्र अभ्यासकाकडून पत्रिकेतील आपली नाडी बघितली (अर्थात ती तज्ञज्ञांकडून केलेली असेल तर) आणि आयुर्वेदाचार्यांकडूनही तपासली तर आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही, कारण ती अगदी तंतोतंत सारखीच असते.
यावरुन नाडी व आयुर्वेद यांच्यातील एकवाक्यता, संबंध व त्यांचे महत्त्व स्पष्ट होते.
वरील तीनपैकी कोणतीही एक नाडी दोघांच्याही पत्रिकेत असेल तर त्यांच्या शरीराची प्रवृत्ती एकच असते. एकच प्रवृत्तीमुळे संततीत काही दोष निर्माण होऊ शकतात. Nadi Dosh
जन्माला येणारे बाळ हे शाररीक व मानसिक कमकुवतही जन्माला येऊ शकते. विज्ञानानेही ते आता मान्य केले आहे. तोच हा नाडी दोष.Nadi Dosh
हा नाडी दोष :-
संततीत निर्माण होणा-या दोषांमुळे एक नाडी विवाह करु नये, असा सल्ला दिला जातो. दुसरा दुष्परिणाम म्हणजे पती-पत्नीला एकाच वेळी आरोग्यविषयी तक्रारी सुरु होण्याचा संभव असतो. Nadi Dosh
आपण बहुतेकदा र्आश्चर्य व्यक्त करतो, की एखादा अचानक एवढा दुर्धर आजार कसा निर्माण होऊ शकतो. वैद्यकशास्त्रसुद्घा काही वेळेला त्याचे उत्तर देऊ शकत नाही.
अशा वेळी तो नाडी दोषाचे परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा परिणाम म्हणजे वैवाहिक आयुष्यातील आकर्षणही कमी होते.Nadi Dosh
नाडी दोषाच्या अपवादांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणा-या दुष्परिणामांची तिव्रता कमी होते. त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह जुळविण्यास काहीही हरकत नसते. Nadi Dosh
आपली पुढील पिढी आरोग्य संपन्न, बुद्घीनेही सुदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
काय होते जर पती पत्नी ची नाडी सारखी असेल तर :- Nadi Dosh
१) जर दोघांची आद्य आद्य नाडी असेल तर तिथे पुरुष स्त्रीला भारी पडतो.Nadi Dosh
2) जर दोघांची अंत्य अंत्य नाडी असेल तर इथे स्त्री पुरुषाला भारी पडते.Nadi Dosh
३) जर दोघांची मध्य मध्य नाडी असेल तर हे दोघेही स्वतःला पूर्ण मानतात. त्यांना एकमेकांची आवश्यकता नसते अशातला भाग होतो.
४) अष्टकूट मधे आपल्या दोघांची नाडी एकच असेल तर शून्य गुण दाखविले जातात.Nadi Dosh
जर दोघांची एकच नाडी असेल आणि विवाह झाला तर इथे शारीरिक पीडा किंवा शारीरिक संबंध करताना एखादा त्रास होण्याची शक्यता फार असते. असे कोणतेच कारण नसेल तर शरीर सुख घेताना काही कारणे समोर असू शकतात.
जसे एखादे नेहमीचे टेन्शन, (मानसिक त्रास), किंवा वेळ न मिळणे किंवा एकमेकांपासून चा काही कारणाने दुरावा.
जर वरील प्रकार दिसला नाही आणि समजा मूल झालेच कोणताही त्रास न होता तर अशा सर्व मुलांना आईवडिलांना सांभाळण्यासाठी खालील त्रास १००% होताना पाहिले गेले आहेत.
त्यांच्यातली न्यूनगंडता, एखादा आजार, एखाद्या विषयावरील त्रास हा नेहमी त्याच्यासमोर असतोच. काही ज्योतिषांच्या मते इथे दोघांपैकी एकाचा मृत्यू हे कारण सुद्धा सांगण्यात येते ह्यावर मी अजून ठाम नाही.
एकच नाडी पण नाडी दोष नाही असे केव्हा होईल ?
मुलगा आणि मुलीची एकच नाडी असेल पण नक्षत्र वेगवेगळे असेल.
मुलगा आणि मुलीची एकच नाडी असेल एकच नक्षत्र सुद्धा असेल पण राशी वेगवेगळी असेल. ह्याचा निर्णय घेताना फक्त योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा हि विनंती. स्वतःहून काही निर्णय घेऊ नये.
नाडी दोष आणि ज्योतिषीय उपाय :- Nadi Dosh
जर वधू (मुलगी) आणि वर (मुलगा) ह्यांची नाडी एकच असेल तर विवाह न करावा असे आपल्याला सांगण्यात येते. पण विवाह झालाच असेल तर ह्यावर खालील उपाय करून आपले त्रास काही प्रमाणात दूर करू शकता.
१) अशा जोडप्यांची सर्वात प्रथम शिवाला शरण जावे. कोणतीही शिव उपासना आपल्याला खूप प्रमाणात त्रास कमी होण्यास मदत करेल. Nadi Dosh
जसे शिव पिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक करणे प्रत्येक सोमवारी किंवा रोज, रुद्राभिषेक (लघु रुद्र महारुद्र) वर्षातुन एकदा करणे वगैरे. लग्न झाल्यावर प्रथम निदान ५ वर्षे तरी करत राहावे. महामृत्युंजय मंत्र सुद्धा आपल्याला ह्यात अवश्य मदत करेल.
2) आपल्या जन्म दिवशी गरिबांना सात्विक भोजन अन्न दान करत रहावे.Nadi Dosh
३) घरात जर शक्य असेल आणि रोज शिव उपासना घरात करायची असेल तर फक्त स्फटिक शिवलिंगाची स्थापना करावी आणि रोज अभिषेक करावा. त्यात जलाभिषेक करून चंदन लेप लावून रोज एक तीन बेलपत्र अर्पित करावे.
४) शक्य असल्यास ब्राह्मणांना सोन्याचा नाग किंवा सोन्याचा (११ ग्राम वजन) असलेला बाळकृष्ण योग्य ब्राह्मणांला दान करावे असे सुद्धा सांगितले गेले आहे. पद्म पुराण नुसार, (शक्य असल्यास करून घ्यावे.)
५) लग्न करण्या अगोदर किंवा नंतर सुद्धा आपली पत्रिका योग्य ज्योतिषांना दाखवूनच लग्न करावे त्यात दोघांचे कुंडलीचे ५ वे स्थान किती मजबूत आहे ते जरूर चेक करावे. एक संतान झाली असेल आणि दुसऱ्याचा विचार करताना सुद्धा ह्या बाबी चेक करूनच निर्णय घ्यावा.Nadi Dosh
६) पती पत्नी पैकी एखाद्याला शारीरिक त्रास सहन करावा लागत असेल तर अशा वेळी आजारी व्यक्तींना जास्तीत जास्त कोणतीही मदत करत रहावी.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Teelgram Group अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी आपल्याला दिसत असलेली घंटी ( Bell Icon) नक्कीच दाबावे.
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या निवारण विशेतज्ञ)
If you have any work from me or any types of quries , you can send me message from here. It's my pleasure to help you.
Book Your Appoitment Now With Best Astrologers